लालबागचा राजा काय महापौर बंगला वाटला का?; Sanjay Shirsat यांचा संजय राऊतांवर पलटवार

शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवसेना उबाठा गटाला 'स्लो पॉयझन'ने संपवले आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही, असे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

224

गणेशोत्सवात सुद्धा हे मूर्खासारखे स्टेटमेंट करत आहेत. लालबागचा राजा हा काय महापौर बंगला वाटला का? जे महापौर बंगल्याचे वैभव होते, ते आता कुठे आहे? स्वतः काय खाल्ले त्याकडे लक्ष द्या, लोकांना नाव ठेऊ नका. लालबागच्या राजाचे दर्शन घ्या. हे भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असून लोकांना हिणवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांच्यावर केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यावर टीका करताना संजय राऊत यांनी मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये पळवले, तर लालबागचा राजाही नेणार का, अशी टीका केली. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी उपरोक्त पलटवार केला.

(हेही वाचा Kolkata Rape Case प्रकरणी ठोस कारवाई न केल्याने TMC च्या खासदाराचा राजीनामा)

शरद पवारांनी उबाठाला संपवले 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीत, हे त्यांनी अधोरेखित केले आहे. हे समजायला जास्त मेंदूची गरज नाही. मात्र त्यांचा मेंदू सडलेला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवसेना उबाठा गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवले आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही, असेही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांना शिंदे गट महायुतीमधून काढून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले, आम्हाला कोणालाही बाहेर काढायचे नाही. अजित पवार हे मजबुतीने महायुतीतच आहेत. मात्र यांना वाटते अजित पवार बाहेर जाऊन महायुतीत फूट पडावी. तसे काही घडणार नाही, अजित पवार महायुतीमध्येच आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.