Sanjay Raut यांना नवाब मलिक यांचा पुळका

112
Sanjay Raut यांना नवाब मलिक यांचा पुळका

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंगळवारी २० ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नवाब मलिक यांचा पुळका आला. राऊत म्हणाले की नवाब मलिक यांच्यावरील सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने दाखल केले असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे नाहीतर मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, असे पत्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिले ते तरी मागे घ्यावे, असे आवाहन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

(हेही वाचा – Lateral Entry भरती काँग्रेसनेच सुरु केलेली; मोदी सरकारने ती रद्द केली)

देशद्रोहाचे आरोप

महाविकास आघाडी सरकारमध्ये मलिक हे मंत्री पदावर असताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांना तुरुंगवास झाला. जून २०२३ मध्ये अजित पवार यांनी ४० आमदारांसह राष्ट्रवादी पक्षत्याग केला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना-भाजपा सरकारला पाठींबा देत सरकारमध्ये सामील झाले. दरम्यान, मलिक यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर आले.

(हेही वाचा – RBI on Food Inflation : रिझर्व्ह बँकेच्या न्यूजलेटरमध्येही अन्नधान्याच्या वाढत्या महागाईवर चिंता)

अधिवेशनात हजेरी

नागपूरला हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक यांनी हजेरी लावली आणि अजित पवार यांच्या आमदारांसह त्यांच्या बाजूच्या बाकावर बसले. तेव्हा फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तर, सोमवारी १९ ऑगस्टला मलिक यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला हजेरी लावली. यावरून पत्रकारांनी विचारले असता, राऊत (Sanjay Raut) म्हणाले फडणवीस यांनी मलिक यांच्यावरील आरोप मागे घ्यावेत.

अजित पवार हे फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये आहेत. फडणवीस यांचे ‘ते’ पत्र एक ऐतिहासिक दस्तावेज आहे आणि मी आजही जपून ठेवले असून फडणवीस यांनी ‘ते’ पत्र मागे घ्यावे, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.