‘बांग्लादेशप्रमाणे भारतही पेटणार..’ Bangladesh चे पत्रकार Salah Uddin Shoaib Choudhury यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केला दावा

295
‘Rahul Gandhi यांच्या विरोधातील पुरावे उघड केले तर आंगडोंब उसळेल’ : Salah Uddin Shoaib Choudhury

‘बांग्लादेश पेटला तसा भारतदेखील पेटणार’, असा खळबळजनक दावा बांग्लादेशचे ज्येष्ठ पत्रकार आणि बांग्लादेशी ब्लिट्झ या साप्ताहिकाचे संपादक सलाहुद्दीन शोएब चौधरी (Salah Uddin Shoaib Choudhury) यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केला.

चौधरी यांचे गौप्यस्फोट

चौधरी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला खास मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. “भारतात जवळपास पाच ते सात कोटी रोहिंग्या वास्तव्य करीत असून ते सगळे कट्टर मुस्लिम आहेत आणि सगळे रोहिंग्या हे निसर्गतः गुन्हेगार आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा. भारतातील केरळ, पश्चिम बंगालमध्ये तर शेकड्याने जिहादी स्लिपरसेल्स आहेत. २०१४ मध्ये जमात-उल-मुजाहिदीन (जेएमपी) या मुस्लिम संघटनेचा एक नेता जो बांग्लादेशातील तुरुंगातून पळाला आणि पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास आहे तो तिथून संघटन चालवतो. ही अल-कायदाचा भाग आहे, पाकिस्तानी आयएसआय, ‘इसीस’सुद्धा यात सहभाग आहे. जसा बांग्लादेश पेटला तसा भारतही पेटणार,” असा खळबळजनक दावा चौधरी यांनी केला. (Bangladesh)

(हेही वाचा – Praja Report : विधानसभेचे कामकाज ४३ टक्क्यांनी घटले, महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावर)

तिकडे ‘मुस्लिम’ इकडे ‘सेक्युलर’ कार्ड

बांग्लादेशात मुस्लिम बहुसंख्य असून हिंदू अल्पसंख्य आहेत मात्र भारतात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकतात का? असे विचारले असता, चौधरी म्हणाले, “बांग्लादेशात त्यांनी ‘मुस्लिम’ कार्ड वापरले तर भारतात ते ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) कार्ड वापरणार. कार्ड वेगळे असले तरी कट सारखाच असेल. भारत उध्वस्त करण्याचे षड्यंत्र हे अमेरिकेकडून रचण्यात येत आहे. त्याला राहुल गांधीही जबाबदार आहेत. बांग्लादेशात याची सुरुवात विद्यार्थी आंदोलनातून झाली आणि पुढे पसरले. भारतात शेतकरी किंवा मजदूर किंवा अशा प्रकारे कोणत्याही आंदोलनाचा आधार घेऊन हा कट रचला जाईल,” असे चौधरी म्हणाले. भारत हा आता जगातील वेगाने वाढती अर्थव्यवस्था, महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने भारताचे नुकसान करण्याचा त्यांचा मानस आहे. (Bangladesh)

(हेही वाचा – BMC Hospital : रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षकांसह रुग्णालय कर्मचारी, डॉक्टरांची अरेरावी नको; बांगरांनी टोचले कान)

.. यामागे अमेरिकाही आणि गांधीही

“भारतात जे हिंदू ९० टक्के लोक शांतताप्रिय आहेत, राजकीयदृष्ट्या जागरूक नाहीत. बांग्लादेशातही सगळे १७ कोटी लोक कट्टर नाहीत. पण जसं एका विमानात ४०० प्रवासी असतात आणि त्यांना ओलिस ठेवणार ४-५ जण असतात, तसा प्रकार आहे. आणि अशाच प्रकारे अमेरिकेने अनेक देश अगदी अफगाणिस्तान, इराक, लिबिया आणि आता युक्रेन. या देशातही तेच झाले. समाजातील एखाद्या प्रमुखाला अमेरिका पकडते आणि त्यांच्याकरवी ते घडवून आणले जाते,” असे सांगताना चौधरी यांचा रोख राहुल गांधी यांच्याकडे होता. परदेशातून अनेक पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी पैसे घेतले. (Bangladesh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.