Sachin Waze on Anil Deshmukh: वसुली प्रकरणात सचिन वाझेंकडुन नवा गौप्यस्फोट; अनिल देशमुख यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख

471
Sachin Waze on Anil Deshmukh: वसुली प्रकरणात सचिन वाझेंकडुन नवा गौप्यस्फोट; अनिल देशमुख यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख
Sachin Waze on Anil Deshmukh: वसुली प्रकरणात सचिन वाझेंकडुन नवा गौप्यस्फोट; अनिल देशमुख यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख

मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट (Sachin Waze on Anil Deshmukh) केला आहे. वसुली प्रकरणात सचिन वाझेंने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव घेतले आहे. अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत असे. याचे पुरावे सीबीआयकडे असल्याचा दावा सचिन वाजे यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

“मी नार्को चाचणीसाठी तयार”

तुरुंगात गेल्यानंतर सचिन वाझे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएमार्फत पैसे देत असत. यासंदर्भात सीबीआयकडे पुरावे आहेत. यासंदर्भात मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही पत्र लिहून कळवले आहे. अशा परिस्थितीत मी नार्को चाचणीसाठी तयार आहे. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी जयंत पाटील यांचे नावही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रामुळे राजकारणात खळबळ उडणार आहे, हे निश्चित. (Sachin Waze on Anil Deshmukh)

जयंत पाटलांवर नेमके आरोप काय?
सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या पत्रात सचिन वाझेंनी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. या पत्रातच अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केले आहेत. पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल. (Sachin Waze on Anil Deshmukh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.