RSS देशाची सेवा करणारी संघटना; सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना सुनावले

117

काँग्रेससह विरोधी पक्ष सध्या सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत आहेत. लोकसभेत राहुल गांधी यांच्याकडून संघाला टार्गेट केले जात असताना राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार राजीलाल सुमन यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी कडक शब्दांत सुनावले.

संघाचे निःस्वार्थ काम 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करणे संविधानाच्या विरोधात आहे, असे धनखड म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात गदारोळ झाला व विरोधी पक्षांनी सभात्याग केला.जगदीप धनखड पुढे म्हणाले, राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. जे सदस्य हे करत आहेत, ते संविधान पायदळी तुडवण्यासारखे आहे. आरएसएस (RSS) देशाची सेवा करणारी संस्था आहे. आरएसएसशी निगडित लोक नि:स्वार्थपणे काम करतात. त्यांनाही देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. आरएसएसची विश्वासार्हता निर्दोष आहे. राष्ट्रीय कल्याण आणि आपल्या संस्कृतीत RSS चे योगदान पाहून आनंद होतो. अशा कोणत्याही संस्थेचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.
समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी एनटीए (National Testing Agency) अध्यक्षांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सरकारसाठी या पदावर असणारी व्यक्ती संघाशी संबंधित आहे की नाही हे महत्त्वाचे आहे, अशी टीकाही केली होती. यावर जगदीप धनखड संतापले आणि ही टिप्पणी रेकॉर्डवर येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.