Waqf Board Amendment Bill विषयी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार

119
Waqf Board Amendment Bill विषयी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार
Waqf Board Amendment Bill विषयी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार झाला आहे. तो नियोजित वेळेत सादर केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल (Jagadambika Pal) यांनी दिली. ते समितीच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करत होते. (Waqf Board Amendment Bill)

विरोधकांनी अहवाल तयार झालेल्या माहितीला नकार दिला. विरोधकांना यावर अजून चर्चा करायची आहे. त्यासाठी समिती अहवाल सादर करण्याची मुदत वाढविण्यास विरोधक इच्छुक आहेत. लवकरच विरोधी पक्षाचे खासदार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन जगदंबिका पाल यांच्याबद्दल तक्रार करतील आणि त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करतील. वक्फ विधेयकात सुधारणा करण्याचा जेपीसीचा प्रयत्न आहे. जेणेकरून वक्फ मालमत्तेचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी होईल.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: विजयी आमदार सांभाळण्याचे मविआसमोर आव्हान !)

विरोधकांच्या मागणीविषयी जगदंबिका पाल म्हणाले, ही शेवटची बैठक नाही. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास प्रस्तावित दुरुस्तीवर त्यांचे मत घेतले जाईल आणि त्यावर एकमत होईल. आमचा अहवाल तयार असून समिती वेळेवर अहवाल सादर करेल. आजच्या बैठकीत अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाला बोलावण्यात आले होते. सुमारे ६ तास ही बैठक चालली.

समितीने २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस या विधेयकावर आपला अहवाल सभागृहात सादर करणे अपेक्षित आहे.

या वर्षी २२ ऑगस्टपासून, वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ वर संयुक्त संसदीय समितीने २५ बैठका घेतल्या आहेत. समितीने सहा मंत्रालयांच्या कामाचा आढावा घेतला आणि सहा राज्यांचे प्रतिनिधी, आठ वक्फ बोर्ड आणि चार अल्पसंख्याक आयोगांसह १२३ भागधारकांचे म्हणणे ऐकले. (Waqf Board Amendment Bill)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.