Rashmi Shukla देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; नेमकं कारण काय ?

126
Rashmi Shukla देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; नेमकं कारण काय ?
Rashmi Shukla देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; नेमकं कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहिर झाला आहे. राज्यात महायुतीने (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला आहे. यादरम्यान, राज्याच्या माजी पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केलं होतं. त्यानंतर आता रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.

कारण काय ?
फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर (Rashmi Shukla) करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे या आधी राज्याचे गृहमंत्री होते. आताही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. तसेच गृहखातंही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी मिळावी किंवा इतर कोणतीही मोठी जबाबदारी मिळावी यासाठी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.

कोण आहेत रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. रश्मी शुक्ला यांनी भुगर्भशास्त्र या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 22 व्या वर्षी त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 2005 रश्मी शुक्ला यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये, जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यान त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2013 मध्ये, रश्मी शुक्ला यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. 2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

2014 ते 2019 या काळात रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. राज्याच्या पोलीस महासंचलाकपदी नियुक्ती होण्यापूर्वी रश्मी शुक्ला या केंद्रात सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मात्र, राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.