मंत्रीपद, विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची Ramdas Athawale यांची मागणी

99
मंत्रीपद, विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची Ramdas Athawale यांची मागणी
  • प्रतिनिधी 

महायुती सरकारमध्ये एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची मागणी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, महायुतीने महाराष्ट्राची निवडणूक जशी एकजुटीने लढविली तसेच सरकारही एकजुटीने स्थापन व्हायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा – PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून महिला ताब्यात)

आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये रिपाईला एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा मिळायला पाहिजे. कार्यकारणीच्या बैठकीत काही ठराव पारित करण्यात आले. यात महायुतीला भरघोस मतदान करण्यासाठी मतदारांचे आभार मानले गेले. महाराष्ट्र सरकारने 2011 पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्या नियमित केल्या आहेत. आता 2019 पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित कराव्यात. गावखेड्यांमध्ये गरिबांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. यामुळे सरकारने ज्यांच्याकडे शेती नाही अशांना पाच एकर शेतजमीन देण्याची मागणी सुद्धा आठवले यांनी यावेळी केली.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा करताना गावसकरांनी विराटची तुलना केली नदाल, फेडरर आणि जोकोविचशी…)

आठवले गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील मुद्यावर चर्चा करणार आहेत. शिवाय, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही दिल्लीत भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.