Ramdas Athawale : जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत संविधान राहील

105
Ramdas Athawale : जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत संविधान राहील
Ramdas Athawale : जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत संविधान राहील

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले आरक्षणही राहील. आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा (Rahul Gandhi) निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्याचा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

(हेही वाचा – गँगस्टर Lawrence Bishnoiला मुंबईत आणण्याच्या हालचालीला वेग)

यावेळी आठवले म्हणाले, सामाजिक दृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष आरक्षण विरोधी असल्याचेच उघड झाले आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती ? परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे (Rahul Gandhi) उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही असे परदेशात जाऊन बरळणे चुकीचे आहे. लोकतंत्र आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

(हेही वाचा – चाकरमान्यांचे हाल संपेनात; Mumbai Goa Highway वर वाहनांच्या लांबच लांब रांगा   )

काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत होती. त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झाले आहेत. आजही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे दलित आदिवासी मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. असे आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी माफी मागावी. अशी बेफाम भाषा करून त्यांनी बाबासाहेबांचा आणि संविधानाचा तसेच दलीत समाजाचा अपमान केला आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आमच्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.