Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक

234
Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक
Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक

पुणे सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा (Rajshree Munde) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा-Maharashtra Assembly Election: ‘या’ दिवशी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; ११० नावांवर शिक्कामोर्तब)

अपघाताची घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, महामार्गावरून जाताना राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. (Rajshree Munde)

(हेही वाचा-CJI Chandrachud :१० नोव्हेंबरला संपणार सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ; पत्र लिहून केली ‘या’ नावाची शिफारस)

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केलं.(Rajshree Munde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.