Rajkot Fort : दंगली कशासाठी, सत्तेच्या मलईसाठी!

122
Rajkot Fort : दंगली कशासाठी, सत्तेच्या मलईसाठी!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

संभाजीनगरहून सलग दोन लोकसभा निवडणूक हरणारे शिउबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना भलतीच चिंता सतावतेय. छत्रपतींचा पुतळा कोसळला तरी दंगली का झाल्या नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे. दंगली झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत खैरे हे पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत होते आणि आता ते उबाठा गटात आहेत. उबाठाचे बोलके नेते संजय राऊत यांनाही प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र पेटत का नाही? मुळात यावरुन आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की दंगली घडाव्यात असं यांना का वाटतं? यांना महाराष्ट्र का पेटवायचा आहे? यांना महाराष्ट्राचा मणिपूर का करायचा आहे? (Rajkot Fort)

(हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ? )

दोन प्रकारे तुम्ही सत्ता स्थापन करु शकता. एक प्रकार दीर्घ प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्हाला विकास कामे करावी लागतात, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करावे लागते, विविध मुद्द्यांवर लोकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करावं लागतं. लोकांचं संघटन करुन सज्जनशक्ती निर्माण करावी लागते. हा मार्ग खूप कष्टदायक आहे. यासाठी अनेक वर्षे परिश्रम घ्यावे लागतात. हे परिश्रम घेण्याची ज्यांची सिद्धता नसते, ते दुसरा मार्ग अवलंबितात. दुसरा मार्ग विघातक आहे, पण खूपच सोपा आहे. दुसऱ्या मार्गावरुन चालताना तुम्हाला आधीच्या मार्गातील कोणतीही गोष्ट करायची नाही. तुम्ही हिंदुंमधील जातीजातींमध्ये फूट पाडणे, ठिकठिकाणी दीर्घ आंदोलने करुन लोकांची तारांबळ उडवणे, बेताल वक्तव्ये करुन लोकांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण करणे, त्यांची माथी भडवणे इत्यादी गोष्टी करु शकता. तसेच तुम्ही मुस्लिमांना जवळ करु शकता आणि त्यांना भारतीय न बनवता त्यांच्या गरजा पूर्ण करु शकता. त्यांच्या गरजा काय आहेत? चांगले रस्ते, मेट्रो, आधुनिकीकरण या मुस्लिम समाजाच्या मागण्या नाहीत. मुस्लिम समाजाच्या मागण्या विरोधकांना चांगल्याच माहित आहेत. त्या मागण्या पूर्ण झाल्या तर या समाजासारखा निष्ठावान मतदार दुसरा नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांच्या मागण्या पूर्ण करतात म्हणून त्या निवडून येतात. हा शॉर्ट-कटचा मार्ग आहे. यासाठी परिश्रम करावे लागत नाहीत आणि यातील घातक बाब म्हणजे दंगली घडवण्यासारखी परिस्थिती उत्पन्न करणे. (Rajkot Fort)

(हेही वाचा – Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज)

दंगली घडवून देखील सत्ता मिळवता येते आणि म्हणूनच विरोधक दंगल घडण्याची, महाराष्ट्र पेटण्याची, महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. चंद्रकांत खैरे यांना जी चिंता सतावत आहे, ती हीच आहे की इतकं सगळं करुनही, लोकांना भडकवूनही, जातीजातीत भांडणे लावूनही, धर्माधर्मांत विष कालवूनही लोक शांत कसे बसलेत? दंगली का करत नाहीत? राजू शेट्टींना सुद्धा प्रश्न पडतो की बांगलादेशप्रमाणे आपण आपल्या पंतप्रधानांना का पळवून लावू शकत नाही? लक्षात घ्या, खैरे किंवा शेट्टींना पडणारा प्रश्न हा प्रश्न नसून इच्छा आहे. पण हिंदुस्थानाच्या सुदैवाने आणि आपल्या जनतेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार झाल्यामुळे आपण सज्जनतेचा मार्ग स्वीकारतो, दंगलीचा – अफझलखानाचा मार्ग स्वीकारत नाही आणि हीच अफझलखान फॅन क्लबची, विरोधकांची पोटदुखी आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी दंगलीची मलई खाण्याचे विरोधकांचे मनसुबे सफल होत नाहीत. म्हणून ते अस्वस्थ झालेत. आपण जनता सज्जन आहोत, तरी देखील आपण सज्जनांनी अखंड सावधान असले पाहिजे. यांचे मनसुबे सत्त्यात उतरवण्यासाठी ते गुंडप्रवृत्तीचा वापर करु शकतात. मात्र यावर सज्जनांचे संघटन हेच एकमेव उत्तर आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ह्यांना सत्ता स्थापनेसाठी दंगलीच्या मलईचा आस्वाद घेण्यापासून रोखणे, हे आपल्या समोरचे मोठे आव्हान आहे. (Rajkot Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.