EVM पूर्णत: सुरक्षितच, कशी घेतली जाते खबरदारी?

134
EVM पूर्णत: सुरक्षितच, कशी घेतली जाते खबरदारी?
EVM पूर्णत: सुरक्षितच, कशी घेतली जाते खबरदारी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले. महाराष्ट्रात एका टप्प्यात दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतमोजणीसंदर्भात माहिती दिली. कुमार (Rajiv Kumar) म्हणाले की, मजमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सकाळी ९ वाजून ३१ मिनटांनी आम्ही सर्वात पहिल्यांदा पहिल्या फेरीतील आकडेवारी जारी करतो. मात्र काही वृत्तसंस्थांकडून एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सकाळी ९ वाजल्यापासूनच आकडेवारी दर्शवण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीला एक्झिट पोलनुसार आकडेवारी दिसत पण नंतर वास्तव वेगळे भासते. त्यामुळे अपेक्षा आणि वास्तव यामध्ये फरक जाणवतो. (EVM)

( हेही वाचा : Assembly Election : महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

तसेच ईव्हीएमबाबत राजीव कुमार (Rajiv Kumar) म्हणाले की, निवडणूकीच्या पाच ते सहा महिन्याआधी एफएलसी (First Level Check (FLC) of EVMS) होते. आतापर्यंत ईव्हीएमसंदर्भात आमच्यापर्यंत २० तक्रारी आल्या आहेत. त्या २० तक्रारीचे आम्ही प्रत्येकाला स्वतंत्र पद्धतीने लेखी स्वरुपात निवारण करू. एफएलसीनंतर randomization,सेकंड randomization त्यानंतर स्टोरेजमध्ये ठेवणे, तिथून बाहेर काढणे. कमिशनिंग करणे त्यानंतर पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणे. त्यानंतर पुन्हा बुथवर वोटिंग होते. पुन्हा सिल करून स्टोरेजवर ठेवले जाते. आणि पुन्हा मतमोजणीसाठी बाहेर काढले जाते. या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षाचे सदस्य उपस्थित असतात. ईव्हीएम (EVM) मशिनच्या कमिशनिंग होताना त्यात बॅटरी टाकली जाते. (EVM)

कमिशनिंग म्हणजे काय

मतदानाच्या पाच ते सहा दिवस आधी कमिशनिंग होते. त्यादिवशी चिन्ह लोड करून मशीनमध्ये बॅटरी टाकली जाते. आणि ती बॅटरी टाकताना राजकीय पक्षाच्या उमेदवाराची सही घेतली जाते. त्यानंतर ही ईव्हीएम मशीन गुप्त खोलीत ठेवली जाते. त्यात दोन लॉक लावले जातात. तसेच त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ईव्हीएमसाठी असते. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशीही पुन्हा प्रोसेस होते. मतदान होते आणि उमेदवाराला पुन्हा शेवटची प्रोसेस दाखवून त्याची सही घेतली जाते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया १०० टक्के निर्देाष आहे, असे ही राजीव कुमार म्हणाले. (EVM)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.