‘एक देश एक निवडणूक’ वर Raj Thackeray यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

183
मनसे नेत्यांची बैठक सोडून Raj Thackeray यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
  • प्रतिनिधी

‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे. पण आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी (१८ सप्टेंबर) एक्स या समाज माध्यमातून केली.

येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन चार वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? असे सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहेत. निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा – Pakistan मध्ये आता पाणीबाणी; भारताने उचलले ‘हे’ पाऊल)

(हेही वाचा – Jai Malokar: मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू!)

भाजपाच्या राजकीय अजेंड्यावर असलेल्या ‘एक देश एक निवडणूक’ या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी, अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. तसेच देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल, आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे म्हटले आहे.

बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नमूद केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.