राज ठाकरेंनी सभेत दाखवला माहीमच्या समुद्रातील बेकायदा दर्गा; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना दिला अल्टिमेटम 

98

माहीम येथील मगदूम बाबाच्या दर्ग्यासमोर समुद्रात चक्क मुसलमानांनी बेकायदा दर्गा बांधला आहे. त्याठिकाणी तेथील मुसलमान नमाजाची कायम ये-जा करत असतात, याबाबत ना महापालिका ना मुंबई पोलिसांना माहित नाही, अशी धक्कादायक माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत दिली, त्यासाठी त्यांनी या दर्ग्याचे ड्रोन वरून केलेले शूटिंग या सभेत दाखवले, तसेच पुढील महिनाभरात हा दर्गा हटवण्यात यावा, अन्यथा त्याच्या बाजूला गणपतीचे मोठे मंदिर बांधू, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

नवीन हाजीअली तयार करणार का?

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. प्रशासन म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते, प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. देशातील मुसलमानाने हे पाहून त्यांना हे मान्य आहे का, हे सांगावे. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी यावर कारवाई केली नाही तर महिनाभरात काय होईल याचा अंदाज घ्या. माहीम येथील मगदूम बाबा दर्ग्यासमोर समुद्रात बेकारीदेशीर दर्गा उभा केला आहे, कुणाचे लक्ष नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजीअली तयार करणार का? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना आजच सांगतो, महिनाभराच्या आत हे जर तोडले नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठे गणपतीचे मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही, मग साला काय व्हायचे ते होऊ द्या. असे बेकायदेशीर बांधकाम चालू देणार नाही. हे राज्य जर माझ्या हातात आले, तर सगळे सुतासारखे सरळ करेन. कुणी यावे आणि टपली मारून जावे, डोळ्यादेखत घडते आणि आमचे लक्ष नाही. म्हणून तुम्हाला तुमची ताकद दाखवावीत लागेल, राज्यातील मुसलमानांना हे मान्य आहे का? कसला दर्गा, कोणाची समाधी आहे, माशाची? राज्यकर्ते दुसऱ्या गोष्टीत गुंतले तर हे असे घडते, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी उद्धवने कुरापती केल्या; राज ठाकरेंचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.