TISS च्या रिपोर्टवर राज ठाकरे म्हणाले, त्यांना आत घेण्यापेक्षा बांगलादेशी हिंदूंना..

118
भाषण सुरु असतानाच फटाके वाजले, Raj Thackeray म्हणाले वाजवा त्यांच्या कानाखाली फटाके

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र उमेदवारांची प्रचार रॅली सुरु असताना, TISS चा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. ज्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले. (Raj Thackeray)

( हेही वाचा : उबाठाच्या उमेदवाराचे उर्दूत पत्र; खान हवा की बाण हवा – Raj Thackeray यांचा प्रश्न

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, तुमच्या जिवाचे यांना काहीच पडलेले नाही. एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झालाय. त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, मुंबईमध्ये बांगलादेशी मुस्लिम आणि म्यानमारमधील रोहिग्यांचे प्रमाण येत्या काळात वाढून मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५० टक्क्याहून कमी होणार आहे. आज देशविदेशात पाहतो, हे झुकून, वाकून येतात. आम्ही त्याला माणूसकी म्हणतो. माणूसकीच्या नावाखाली बांगलादेशी आणि रोहिग्यांना आत घेतो. मग जर आतमध्ये घ्यायचं असेल तर बांगलादेशामधील अत्याचार होणाऱ्या हिंदूंना आतमध्ये घ्या, असे विधान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.