“मनसेच्या जाहीरनाम्यात बहिणींसाठी योजना नाही, अशा घोषणांना…”, काय म्हणाले Raj Thackeray ?

107
"मनसेच्या जाहीरनाम्यात बहिणींसाठी योजना नाही, अशा घोषणांना...", काय म्हणाले Raj Thackeray ?

महायुतीच्या जाहीरनाम्यात (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लाडक्या बहिणींसाठी १५०० वरुन २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, मविआने महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. वंचितने महिलांसाठी ३५०० रुपये जाहीर केले आहेत. मात्र मनसेच्या (Raj Thackeray) जाहीरनाम्यात महिलांसाठी आर्थिक मदतीच्या कोणत्याही योजनेचा समावेश नाही.

याविषयी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “महाराष्ट्राचं आर्थिक गणित पाहिल्याशिवाय असल्या घोषणा करू शकत नाही. अशा घोषणा करण्यात अर्थ नाही. राज्यावर बोजा न येता या गोष्टी करता आल्या तर मी याला गिफ्ट म्हणेन. मात्र नंतर या गोष्टी करता आल्या नाहीत तर मी याला लाच म्हणेन.”

(हेही वाचा-वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांसाठी Election Commission कडून इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर दक्ष)

“महिलांना पैसे मिळतात यात आनंद आहे. मात्र यातून आपण खड्डे तर खणत नाही ना याचा विचार केला पाहिजे.” असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार. असे सांगण्यात आले आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. त्यामुळे राज्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विद्यामंदिरे उभी करावीत. गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे. (Raj Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.