Raj Thackeray : “मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाहीत” – राज ठाकरे

एका राज्यावरून देशाचं समीकरण बदलत नाही. इतरांच्या म्हणण्यानुसार ही बदलाची नांदी आहे का हे पाहावं लागेल

208
Raj Thackeray : "मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाहीत" - राज ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या पक्षांतराच्या चर्चा, शरद पवार यांच्या निवृत्तीची घोषणा, सत्ता संघर्ष इत्यादी सारख्या अनेक घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे राजकारणातील हालचालींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्र्यंबकेश्वर मंदिर वाद, नोटबंदी, कर्नाटक निवडणूका अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

(हेही वाचा – Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार तीन दिवसांचा नाशिक दौरा)

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

पत्रकारांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकारावरून प्रश्न केला असता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे. काय संबंध आहे त्याचा गड किल्ल्यांशी? असा सवाल केला. तसेच, महाराष्ट्रात अनेक मशिदी आणि मंदिरे आहेत. तिथे हिंदू-मुस्लिम एकत्र दिसतात. माहीमच्या दर्ग्यात माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो. माझ्याकडे अशी अजून अनेक उदाहरणं आहेत. ही परंपरा सुरू ठेवली पाहिजे. मी (Raj Thackeray) देखील अनेक दर्ग्यात गेलो आहे. इतर धर्मीय मंदिरात आल्याने धर्म भ्रष्ट होतो का? हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का? तसेच एखादा माणूस दर्ग्यात आला म्हणजे धर्म भ्रष्ट कसा होतो? अनेक मुसलमान मंदिरात येतात. महाराष्ट्रातील कित्येक मंदिरात काही विशिष्ट जातीच्या लोकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही ही अत्यंत कोती मनोवृत्ती आहे. मराठी मुसलमान जिथं राहतात तिथं दंगली होत नाही. तसेच बहुसंख्य हिंदू राज्यात हिंदू खतरे मै है असं कसं होईल? त्र्यंबकेश्वरमधील १०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका. अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. बाहेरच्यांनी त्यात पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

हेही पहा – 
हा धरसोड करण्याचा प्रकार

पत्रकारांनी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर विचारलं असता, हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. अशाने सरकार चालतं का? असा प्रश्न विचारत दोन हजारांच्या नवीन नोटा ATM मध्ये पण जात नव्हत्या; अशा शब्दांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली.

तसेच कर्नाटकाच्या निकालावरून ‘एका राज्यावरून देशाचं समीकरण बदलत नाही. इतरांच्या म्हणण्यानुसार ही बदलाची नांदी आहे का हे पाहावं लागेल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.