बदलापूरच्या घटनेवरुन Raj Thackeray यांचा संताप; सरकारला सुनावले खडे बोल

144
बदलापूरच्या घटनेवरुन Raj Thackeray यांचा संताप; सरकारला सुनावले खडे बोल

जनतेच्या पैशातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा राज्यातील महिलांना आधी सुरक्षित ठेवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा सुरक्षित नसेल तर इतर ठिकाणची अवस्था काय असेल, असेही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सुनावले.

बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल म्हणालो होती की यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटले.


(हेही वाचा – Rakesh Tikait यांनी ओकली गरळ; म्हणाले, आमची तयारी पूर्ण, भारताचा बांग्लादेश करणार)

मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिले कर्तव्य नाही का ?

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आला याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचे आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.