पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत Raj Thackeray यांनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं

286
पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं
पक्षासोबत गद्दारी केलेला गद्दार तर घरात बसला आहे; शेवटच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं

“काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घ्यायला ज्यांना लाज वाटते, त्यांच्याबरोबर जाऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. मला मुख्यमंत्री करा आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते जाऊन बसले होते. एका माणसाने आख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्यांना हे गद्दार म्हणत आहेत. गद्दार तर घरात बसला आहे ज्याने पक्षासोबत गद्दारी केली. शिवसेनेची जी सासू आतमध्ये बसली आहे, तिचा प्रॉब्लेम आहे. ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे. हे जर परत निवडून आले, तर महाराष्ट्र संपला म्हणून समजायचे तुम्ही. २०१९ पासून जे काही झालं ते विसरु नका. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे, अशी घणाघाती टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.

(हेही वाचा – हिंदुत्वाला तडा घालण्याचे काम शरद पवारांनी केले; शेवटच्या सभेत Raj Thackeray बरसले)

शिवडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लालबाग येथे शेवटची सभा घेतली. शेवटच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरेंचे मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला संरक्षण

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या मशि‍दींवरचे भोंगे मी खाली आणायला सांगितले. त्यानंतर भोंगे खाली आले पण. आम्ही भोंगे बंद करतो; पण हनुमान चालिसा म्हणू नका, असे सांगितले. उद्धव ठाकरे त्या वेळी मुख्यमंत्री होते. त्या वेळी १७ हजार मनसे कार्यकर्त्यांवर त्या वेळी सरकारने गुन्हे दाखल केले. मशिदींवरच्या लाऊड स्पिकरला संरक्षण देण्यात आले. बाळासाहेबांनी अनेक सभांमध्ये सांगितले होते की, मशि‍दींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल, तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? मनसे कार्यकर्त्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करता त्यावरून तुमचा कल कळला आहे.”

त्या सगळ्या गोष्टी आठवा

“या माणसाच्या वागणुकीमुळे नारायण राणे, मी, एकनाथ शिंदे बाहेर पडले. मग बाळासाहेबांना त्रास देऊन जाणाऱ्या छगन भुजबळांना उद्धव ठाकरे मातोश्रीवर जेवायला बोलवतात. भुजबळांनी त्रास दिला, त्याचे काही देणेघेणे नाही आणि बाकीचे यांचे शत्रू आहेत. गेल्या पाच वर्षात काय झालं, हा माणूस कसा वागला, करोना काळात कसा वागला. या सगळ्या गोष्टी आठवा आणि २० तारखेला मतदानाला जा,” असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.