Rahul Gandhi यांनी आता सौंदर्य स्पर्धेतही आणली जात्यंधता; भाजपाने चांगलेच सुनावले 

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, जात जनगणनेसंदर्भात वक्तव्य करून देशात फूट पाडण्याची गांधींची इच्छा आहे. मागास समाजाची चेष्टा करू नका, राहुल गांधी देशात फूट पाडू शकत नाहीत.

161

सध्या काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात जातीचे राजकारण करत आहेत. जातीय जनगणना करण्याच्या मागणीने त्यांच्यातील जात्यंधता प्रकर्षाने दिसून आली. त्यानंतर अर्थसंकल्प बनवतात किती मागास अधिकारी त्यात सहभागी होते, असा प्रश्न केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मागास अधिकारी किती टक्के आहेत, अशीही विचारणा ते करत आहेत. आता सौंदर्य स्पर्धांमध्ये किती दलित, आदिवासी आणि ओबीटी महिला असतात असे विचारून त्यांनी अकलेचे तारे तोडले आहे. यावर भाजपाने राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले.

‘मिस इंडिया’ स्पर्धेत दलित, आदिवासी आणि ओबीसी महिलांना स्थान मिळत नाही, असे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, जात जनगणनेसंदर्भात वक्तव्य करून देशात फूट पाडण्याची गांधींची इच्छा आहे. मागास समाजाची चेष्टा करू नका, राहुल गांधी देशात फूट पाडू शकत नाहीत. आता राहुल गांधी यांना मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट आणि खेळांतही आरक्षण हवे आहे. हा केवळ ‘बालबुद्धीचा’ मुद्दा नसून त्याचा जयजयकार करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली असू शकते, मात्र आपल्या फुटीच्या चालीत, आमच्या मागास समाजाची चेष्टा करू नका. मिस इंडिया उमेदवारांची निवड सरकार करत नाही. सरकार मिस इंडियासाठी उमेदवारांची निवड करत नाही. ना ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची अथवा चित्रपटांसाठी अभिनेत्यांची निवड सरकार करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाला IAS, IPS, IFS आणि इतर सर्व उच्च सेवांसाठी आरक्षणात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

(हेही वाचा PM Narendra Modi पाकिस्तानात जाणार? पाकिस्तानकडून ‘या’ कार्यक्रमासाठी मिळाले निमंत्रण)

काय म्हणाले होते राहुल गांधी? 

मी मिस इंडियाची यादी बघितली. त्यात कुणीही दलित, आदिवासी अथवा ओबीसी महिला नाही. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबाबत बोलतील. कुणी मोची किंवा प्लंबर दाखवणार नाही. एवढंच नाही तर, प्रसारमाध्यमांमधील आघाडीच्या अँकर्समध्येही ९० टक्क्यांमधील कुणी नाही, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.