भावाला दिलेले आव्हान बहिणीने अर्धवट स्वीकारले; Priyanka Gandhi बाळासाहेबांचे नाव घेताना ‘हिंदुहृयसम्राट’ बोलण्यास कचरल्या

218

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महायुतीच्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. काँग्रेसचे शाहजादा राहुल गांधी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यास सांगा आणि त्यांच्या नावाच्या आधी ‘हिंदुहृयसम्राट’ म्हणण्यास लावा. पंतप्रधान मोदी यांचे हे आव्हान राहुल गांधी यांच्या बहीण प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी स्वीकारले पण अर्धवट पूर्ण केले.

‘हिंदुहृयसम्राट’ म्हणण्याचे टाळले   

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची प्रचारसभा शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी शिर्डीत झाली, तेव्हा त्या बोलताना म्हणाल्या, माझ्या भावाच्या संदर्भात नरेंद्र मोदी सतत बाळासाहेबांचे नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण आहे. मोदीजी ऐकून घ्या. बाळासाहेब ठाकरेंचे नाव ऐकून घ्या. हेही ऐकून घ्या की, आमची विचारधारा, आमच्या पक्षाचे विचार वेगवेगळे होते. परंतु, ना बाळसाहेब ठाकरे आणि नाही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला असता, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. पण यावेळी प्रियंका गांधी यांनी बाळासाहेबांचे फक्त नाव घेतले पण पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदुहृयसम्राट’ उच्चारण्याचे आव्हान दिले होते, तोच शब्द प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) म्हटला नाही.

(हेही वाचा Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…)

मोदींनी काय म्हटले होत? 

उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला सांगा ‘हिंदुहृयसम्राट’ असे बोलायला सांगा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.