पंतप्रधान Narendra Modi यांचा जमशेदपूरमध्ये RJD, काँग्रेस अन् JMM वर हल्लाबोल

79
पंतप्रधान Narendra Modi यांचा जमशेदपूरमध्ये RJD, काँग्रेस अन् JMM वर हल्लाबोल
पंतप्रधान Narendra Modi यांचा जमशेदपूरमध्ये RJD, काँग्रेस अन् JMM वर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (१५ सप्टेंबर) झारखंड दौऱ्यावर आहेत. जमशेदपूर येथील परिवर्तन महारॅलीला (PM Narendra Modi, Jharkhand) संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की झारखंडचे तीन शत्रू आहेत, जेएमएम (JMM), काँग्रेस (Congress) आणि आरजेडी. वेगळ्या झारखंडच्या निर्मितीपासून आरजेडी बदला घेत आहे. तर काँग्रेस झारखंडचा द्वेष करते. इतकी वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने झारखंडच्या विकासासाठी काहीही केले नाही. राज्याचा विकास करायचा असेल तर भाजपाला संधी द्या, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले की, या उत्सवाच्या वातावरणात झारखंडला सहा नवीन वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. या गाड्यांमुळे युवकांसाठी रोजगार आणि प्रगतीच्या संधी निर्माण होतील. हजारो गरीबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कायमस्वरूपी घरे मिळतील. तसेच कर्मपूजेच्या दिवशी बहिणींना या घरात प्रवेश करता येणार आहे. बहिणींना कायमस्वरूपी घर भेट देऊन तुमचा भाऊ धन्य झाला. बहुतेक घरे (PM Awas योजनेची) माझ्या बहिणी आणि आईच्या नावे आहेत. कर्मपूजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आज तुमचा भाऊ तुम्हाला कायमस्वरूपी घर भेट देण्यास सक्षम आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  (Narendra Modi)

(हेही वाचा – PUNE Metro : पुणे मेट्रोत एका दिवसात दोन लाख लोकांनी केला प्रवास)

पंतप्रधानांनी लोकांना सांगितले की झारखंडचे तीन शत्रू आहेत, JMM, RJD आणि काँग्रेस. आजही आरजेडीला झारखंडकडून बदला घ्यायचा आहे आणि काँग्रेस झारखंडचा द्वेष करते. काँग्रेसने दिल्लीतून एवढी दशके देशावर राज्य केले, पण मागासलेले, आदिवासी, दलित यांना पुढे येऊ दिले नाही. आदिवासी मतांचा वापर करून JMM राजकारणात पुढे गेला. (Narendra Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.