जातीनिहाय जन गणनेवरून Prashant Kishor यांनी राहुल गांधींना सुनावले; म्हणाले….

आता बिहारमध्ये लालू यादव, नरेंद्र मोदी यांची सत्ता नाही. नितीश कुमारांची नव्हे तर जनतेची सत्ता हवी, असे प्रशांत किशोर म्हणाले

111

पाटणा येथे आयोजित जन सुराज महिला संवादात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor) यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बिहारच्या नेत्यांचीही खरडपट्टी काढली.

(हेही वाचा Rahul Gandhi यांनी आता सौंदर्य स्पर्धेतही आणली जात्यंधता; भाजपाने चांगलेच सुनावले )

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस स्कीम आणली आहे, ज्यामध्ये २३ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्राने ओपीएस आणि एनपीएसमध्ये मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. तेजस्वी यादव विकासावर बोलतात तेव्हा ते हास्यास्पद वाटते, तेजस्वी यादव सहा महिन्यांपूर्वीपर्यंत नितीश कुमार यांच्यासोबत होते. नितीश कुमार यांनी कर्मचाऱ्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. जन सुरज २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, ज्यामध्ये ४० टक्के महिला उमेदवार असतील. बिहारमध्ये महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आता बिहारमध्ये लालू यादव, नरेंद्र मोदी यांची सत्ता नाही. नितीश कुमारांची नव्हे तर जनतेची सत्ता हवी, असे प्रशांत किशोर म्हणाले  महिलांना आव्हान केले की मुलांना शिक्षण द्या. ज्या नेत्यांनी बिहारला लुटले, ज्यांनी येथील जनतेला कंगाल केले आणि मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले, अशा नेत्यांना मतदान करू नये. त्यांनी तेथे उपस्थित महिलांना आव्हान केले की मुलांना शिक्षण द्या. तुमची मुले जोपर्यंत शिकत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणीही डॉक्टर आणि इंजिनिअर बनवू शकत नाही, असेही प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.