पीएमआरडीएची Pune Metro ला पुन्हा नोटीस!

110
पीएमआरडीएची Pune Metro ला पुन्हा नोटीस!
पीएमआरडीएची Pune Metro ला पुन्हा नोटीस!

मागील काही दिवसांत गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यांसह आदी भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Pune Metropolitan Region Development Authority) मेट्रोचे (Pune Metro) काम करणाऱ्या पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) कंपनीला पुन्हा नोटीस बजावली आहे. यामध्ये तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.

(हेही वाचा-“काँग्रेसला चांगल्या दिवसात दलितांचा विसर पडतो”, Mayawati यांचा टोला)

पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे (PUNE IT METRO RAILWAY LIMITED) संबंधित भागातील रस्त्याची बांधा वापरा हस्तांतरीत करा, या तत्त्वावर करारानुसार जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपासून गणेशखिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अतिशय हळुवारपणे खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यांची संबंधित यंत्रणेने करारानुसार अपेक्षितरीत्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. (Pune Metro)

(हेही वाचा-Child Pornography पॉक्सो अंतर्गत गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल)

मात्र, वारंवार सांगून देखील पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना नोटीस बजावली. (Pune Metro)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.