Special Session : नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला

हे ऐतिहासिक निर्णयाचं सत्र असून नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास यातून मिळणार आहे.

13
Special Session : नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला
Special Session : नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला

संसदेचं विशेष अधिवेशन (Special Session)सोमवारपासून (१८ सप्टेंबर)सुरु होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत असून संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, सत्र छोटं आहे परंतु वेळेच्या हिशोबाने मोठे निर्णय होणार आहेत. हे ऐतिहासिक निर्णयाचं सत्र असून नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास यातून मिळणार आहे. त्यामुळे नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की , वाईटपणा सोडून चांगुलपणाची कास धरत नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. उद्या गणेश चतुर्थीचं पावण पर्व सुरु होत आहे. नव्या भारताच्या स्वप्नांना आता बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा तिरंगा चंद्रावर अभिमानाने फडकत आहे. चांद्रमोहीम यशस्वी झाल्याने जगभरात भारताचा सन्मान वाढलाय. तसेच आपण जी २० परिषद यशस्वी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे भारताचा गौरव होत आहे.
भारताच्या उज्ज्वल भविष्याचा काळ सुरु झाला आहे. काल विश्वकर्मा जयंती होती. देशातल्या विश्वकर्मा समूदायाचा जो परंपरागत व्यवसाय आहे तो त्यांना आधुनिक पद्धतीने करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे, देशात नवीन आत्मविश्वास आपण अनुभव करत आहोत.

(हेही वाचा : Parliament Special Session 2023 : संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये ‘या’ विधयकांवर होणार चर्चा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.