PM Modi Kerala Visit: पंतप्रधान मोदी वायनाडला भेट देणार: भूस्खलनग्रस्त भागाचा घेणार आढावा

116
PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या SPG मध्ये लष्कराच्या जवानांचा समावेश का केला जात नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी केरळमधील (PM Narendra Modi, Kerala) वायनाड (Wayanad Landslide) येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच संबंधित घटनेचा पंतप्रधान नरेंद मोदी हवाई सर्वेक्षण सुद्धा करणार आहेत. या दुर्घटनेमध्ये ३०० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  (PM Modi Kerala Visit) 

३० जुलै २०२४ रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यामध्ये ३९२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५० लोक बेपत्ता आहेत. याशिवाय, अंदाजे २७३ लोक जखमी झाले. तसेच लष्कराचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांचे विशेष पथक सुजीपारा (Sujipara) येथील सनराईज व्हॅलीमधील (Sunrise Valley) जंगलात शोध मोहीम राबवत आहेत. (PM Modi Kerala Visit)

(हेही वाचा – AAP : केजरीवाल यांच्या पक्षाने दिले उद्धव ठाकरेंना टेंशन)

३० जुलैनंतर सुरू झालेल्या दहा दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर भारतीय लष्कर लवकरच वायनाडहून परतणार आहे. लष्कर एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि केरळ पोलिसांकडे बचाव कार्य सोपवेल अशी अपेक्षा आहे. तर इस्रोच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की भूस्खलनाने ८६,००० चौरस मीटर क्षेत्रफळ म्हणजेच ०८ किमी क्षेत्र व्यापलेले आहे.  (PM Modi Kerala Visit)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.