Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ विषयांमुळे गाजणार

76
Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन 'या' विषयांमुळे गाजणार
  • प्रतिनिधी 

संसदेचे हिवाळी अधिवेशन निवडणूक निकालानंतर लगेच २५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यावेळी अधिवेशनात विविध विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आणि वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्याचा विचार करीत आहे. यामुळे हिवाळी अधिवेशन गरम राहण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी २४ नोव्हेंबरला संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान सरकार आणि विरोधकांची रणनीती समोर येणार आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेले अधिवेशन २० डिसेंबरला संपणार आहे. हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. अधिवेशनादरम्यान सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकही आणू शकते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रविवारी होणाऱ्या बैठकीत सरकार सर्व पक्षांना विशेषत: विरोधी पक्षांना सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या संसदीय कार्यसूचीचा तपशील देणार आहे. (Parliament Winter Session)

(हेही वाचा – वृद्ध अभियंत्याची १९ दिवस ‘Digital Arrest’; गमावले तब्बल १० कोटी रुपये)

वादग्रस्त विधेयकावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले की, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ सुनिश्चित करण्यासाठी सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या दिशेने काम करत आहे. सरकार आगामी अधिवेशनाच्या संसदीय कार्यसूचीचा तपशील विरोधी पक्षांना देईल. संसदेत चर्चेच्या विविध विषयांचाही त्याचा उल्लेख करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ सुनिश्चित करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या दिशेने काम करत असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, भारत आता ‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’कडे वाटचाल करत आहे, ती एक धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आहे.

मात्र, काँग्रेसने ही कल्पना साफ फेटाळून लावली होती आणि पंतप्रधानांना या मुद्द्यावर संसदेतील सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल, असे म्हटले होते. त्याचबरोबर या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठीही प्रयत्न केले जाऊ शकतात, जे सध्या संसदेच्या संयुक्त समितीकडे विचाराधीन आहे. याबाबत अहवाल देण्यासाठी ही समिती नियमितपणे विविध राज्यांशी बैठका घेत आहे. झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालही २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत, त्यावर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Parliament Winter Session)

(हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये पोटनिवडणुकीत हिंसाचार; मीरापुरमध्ये दगडफेक तर कुंदरकीत सपा उमेदवारांची पोलिसांनी धक्काबुक्की)

२५ नोव्हेंबरपासून अधिवेशन

संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे की, सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी संसदीय कामकाजासाठी २०२४ (२५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.