Narendra Modi : पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 23 मे रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. तेथील भारतीय समुदायातील लोकांना ते संबोधित करणार आहेत.

139
Narendra Modi : पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नुकताच जपान दौरा झाला. १९ ते २१ मे दरम्यान पंतप्रधान मोदी G7 च्या बैठकीसाठी हिरोशिमा येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक देशांच्या पंतप्रधानांशी बातचीत केली. G7 हा जगातील सात विकसित आणि श्रीमंत देशांचा समूह आहे. ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. त्याला ग्रुप ऑफ सेव्हन असेही म्हणतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २१ मे रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी त्यांचे स्वागत केले. मारेप यांनी मोदींचे चरणस्पर्श करून स्वागत केले. यानंतर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. या इंडो पॅसिफिक प्रदेशाला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान-भारत दौऱ्यात जी 20 आणि जी 7 वर झाली चर्चा)

पापुआ न्यू गिनी सरकारने आपली परंपरा मोडत पंतप्रधान मोदींचे (Narendra Modi) स्वागत केले आहे. वास्तविक, या देशात सूर्यास्तानंतर कोणत्याही परदेशी पाहुण्यांचे राज्य सन्मानाने स्वागत केले जात नाही. मात्र भारताचे महत्त्व पाहून तेथील सरकारने हा निर्णय घेतला.

मारेप यांनी यावेळी मोदींचे (Narendra Modi) चरणस्पर्श करून स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी पापुआ न्यू गिनीतील कलाकारांनी पोर्ट मोरेस्बी विमानतळावर पारंपरिक नृत्य सादर केले. तसेच भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या आईचा फोटो भेट म्हणून दिला.

हेही पहा – 

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 23 मे रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. तेथील भारतीय समुदायातील लोकांना ते संबोधित करणार आहेत. त्यानंतर 24 मे रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानेज यांची भेट घेणार घेऊन 25 मे रोजी सकाळी दिल्लीला परतणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.