Mohammad Rizwan : पाकचा क्रिकेटर मोहम्मद रिझवानने अमेरिकेत दाखवली धर्मांधता; रस्त्यावर नमाज पढला

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिजवानची कार रस्त्याच्या एका बाजूला उभी केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान रस्त्यावर कापड पसरून नमाज पढताना दिसत आहे.

161

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अमेरिकेत आहेत. दोघेही हार्वर्ड विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेथे गेले आहेत. दरम्यान, मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तो रस्त्यावर नमाज पढताना दिसत आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिझवानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिजवानची कार रस्त्याच्या एका बाजूला उभी केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान रस्त्यावर कापड पसरून नमाज पढताना दिसत आहे. मोहम्मद रिजवान याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात नमाज पढताना दिसला होता.

(हेही वाचा 72 hoorain : दहशतवाद्यांचा पर्दाफाश करणा-या ’72 हुरें’चा रिलिजच्या आधीच बोलबाला; कमाईच्या बाबतीत ‘दंगल’लाही टाकले मागे!)

रस्त्यावर नमाज पढणे मुस्लिम देशांमध्ये बेकायदेशीर

अशा घटना भारतात सामान्य झाल्या आहेत. येथे मुस्लिम दररोज रस्त्यावर नमाज पढताना दिसतात. विशेषत: शुक्रवारी नमाज पढताना मुसलमान रस्त्यावर बसतात. त्यामुळे नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रेल्वे स्टेशन आणि रेल्वे रुळांच्या मध्यभागीही नमाज पढण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

भारतातील मुस्लिम धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली खुलेआम नमाज पढताना दिसत असले तरी अनेक इस्लामिक देशांमध्ये उघड्यावर नमाज पढणे बेकायदेशीर आहे. खुद्द सौदी अरेबियामध्ये वाहन थांबवून रस्त्यावर नमाज पढणे बेकायदेशीर मानले जाते. त्याचप्रमाणे, UAE च्या दुबई शहरात रस्त्यावर नमाज पढल्यास सुमारे 8800 रुपये दंड आकारला जातो. त्याच वेळी, युरोपियन देश फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज पढणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.