आता ‘लाडक्या भावांच्या’ खात्यात सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला पैसे होणार जमा – Minister Mangal Prabhat Lodha

181
आता ‘लाडक्या भावांच्या’ खात्यात सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला पैसे होणार जमा - Minister Mangal Prabhat Lodha
आता ‘लाडक्या भावांच्या’ खात्यात सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला पैसे होणार जमा - Minister Mangal Prabhat Lodha

महाराष्ट्र राज्यशासन सर्वच स्थतावरील व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवत असतात. यापूर्वी लाडकी बहीण योजना (Ladki bahin Yojna) राबवली होती. या योजनेचे पैसे ही बहीणींच्या खात्यात जमा झाले असून, काहींच्या तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या (CM Youth Work Training Scheme) घोषणेपासून आजपर्यंत राज्यात १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी मंगळवारी दिली. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मिळणार आहे. अशी माहितीही मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी दिली. त्यामुळे, लाडक्या भावांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होतील.     (Minister Mangal Prabhat Lodha)

(हेही वाचा – Lalbaug Bus Accident: लालबागच्या अपघात प्रकरणी मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदेला अटक )     

याविषयीची अधिक माहिती देताना मंत्री लोढा म्हणाले, “भविष्यातील रोजगाराची (Job) आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (CM Youth Work Training Scheme) ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी ८ आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणा बरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.” या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी  हजार १७० आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच २ लाख ३१ हजार २४४ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे. (Minister Mangal Prabhat Lodha)

१० लाख युवकांना प्रशिक्षण

या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनीदेखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी केले आहे. (Minister Mangal Prabhat Lodha)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.