North West Lok Sabha Election 2024 : जोगेश्वरीत भाजपा नगरसेविकेच्या प्रभागातच किर्तीकरांना अधिक मते

274
North West Lok Sabha Election 2024 : जोगेश्वरीत भाजपा नगरसेविकेच्या प्रभागातच किर्तीकरांना अधिक मते
North West Lok Sabha Election 2024 : जोगेश्वरीत भाजपा नगरसेविकेच्या प्रभागातच किर्तीकरांना अधिक मते
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार (North West Loksabha Election 2024) संघात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाल्यानंतर या केंद्रातील मतमोजणीच्या प्रक्रियेवरच अविश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे ज्या जोगेश्वरी विभागाचे प्रतिनिधीत्व करत होते, त्या मतदार संघातील केवळ चार प्रभागांमध्ये अधिक मते मिळवता आली. तर मागील चार टर्मपासून नगरसेविका असलेल्या आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उज्ज्वला मोडक यांच्या प्रभागांमध्ये किर्तीकर यांना १७ मते अधिक मिळाली आहे. मोडक यांचा हा प्रभाग भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून मोडक आणि वायकर यांच्यातील शितयुध्दाचा परिणाम मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. मोडक यांच्या प्रभागांमधून वायकर यांना अधिकचे मताधिक्य मिळाले असते तर काठावर हा विजय मिळवण्याची वेळच आली नसती,असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. (North West Loksabha Election 2024)

(हेही वाचा- PM Narendra Modi : ‘टीम मेलोडी’पासून सावधान!)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार (North West Loksabha Election 2024) संघांत महायुतीचे (Mahayuti) उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार (Maha Vikas Aghadi) अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांच्यात प्रमुख लढत होती.  या निवडणुकीती अटीतटीच्या लढतीत मतमोजणीची प्रक्रियेत वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या वायकर यांच्या विजयानंतर किर्तीकर यांच्याकडून मतमोजणी प्रक्रियेवरच आक्षेप नोंदवत या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असून आमदार असलेल्या मतदार संघात वायकर यांना स्वत:च्या शिवसेनेसह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. (North West Loksabha Election 2024)

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) चार नगरसेवक, भाजपाचे (BJP) तीन नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress) एक नगरसेविका अशाप्रकारे सात नगरसेवक सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले होते. यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोफि नाजिया यांचे नगरसेवक रद्द झाले .होते. तर मार्च २०२२मध्ये यासर्व नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आला. त्यातच शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ७७चे बाळा नर हे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत राहिले, तर प्रभाग क्रमांक ७३चे प्रविण शिंदे (Pravin Shinde) हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. तर शिंदे गटात गेलेल्या रेखा रामवंशी (Rekha Ramvanshi) यांच्या प्रभागातील काही मतदान केंद्र ही वायकर यांच्या मतदार संघात येत आहेत. परंतु प्रविण शिंदे यांच्या प्रभागांत वायकरांना सुमारे २५०० तर प्रभाग क्रमांक ७९चे सदानंद परब यांच्या प्रभागांत  १५००चे मताधिक्य मिळाले असले तरी स्वत:च्या पक्षातील रेखा रामवंशी यांच्या प्रभागांमध्ये किर्तीकर यांना ४ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर याच गोरेगावमधील काही भाग जो जोगेश्वरी मतदार संघात येतो, त्या प्रभाग क्रमांक ५२मधून वायकर यांना ४०९०चे मताधिक्य मिळाले. भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम (Preeti Satam) आणि वायकर यांच्यामध्ये प्रभागांतील विकासकामांच्या श्रेयवादावरून वाद असताना तसेच प्रत्येक विकासकामांमध्ये वायक आणि सातम यांच्यातील भांडणे जाहीर असतानाही युतीधर्म पाळत सातम यांनी वायकरांना मदत केली. (North West Loksabha Election 2024)

(हेही वाचा- T20 World Cup, Eng vs USA : अमेरिकेला १० गडी राखून हरवत इंग्लडचे विजयाच्या दिशेनं पाऊल )

तसेच प्रभाग क्रमांकचे ७२चे भाजपाचे माजी नगरसेवक पंकज यादव (Pankaj Yadav) यांच्या प्रभागांमध्ये वायकर यांना ५६६०चे मताधिक्य मिळाले. पंकज यादव यांनी मागील विधानसभा निवडणुकीत वायकर यांना निवडून आणण्यासाठी युतीधर्म पाळत मदत केली होती आणि वायकर यांच्याशी त्यांचे आजही तेवढेच चांगले संबंध त्यांनी जपून ठेवले होते. मात्र, एका बाजुला भाजपाच्या (BJP) दोन नगरसेवकांकडून चांगल्याप्रकारे काम केले जात असताना चार टर्म निवडून आलेल्या आणि वायकर यांच्या नावाची घोषणा होताच त्यांना जाहीर विरोध करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक (Ujwala Modak) यांच्या प्रभाग क्रमांक ७४मधून वायकर यांच्या पेक्षा किर्तीकर यांनी १७ मते अधिक मिळवली.  या प्रभागात वायकर यांना ११,५६६ मते तर किर्तीकर यांना ११,५८३ मते मिळाली. त्यामुळे उज्ज्वला मोडक आणि वायकर यांचे कधीच जमले नाही. हा प्रभाग भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो आणि मोडक यांच्या विरोधामुळेच वायकर यांनी या प्रभागांतील अधिक कामे करत शिवसेना पक्ष अधिक मजबूतक केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरीतील मोडक यांच्या प्रभागांतूनच अधिक मते मिळवण्यासाठी संघटनात्मक बाजू मजबूत करणाऱ्या वायकर यांना स्वत:च्या कामाची आणि भाजपाची अशाप्रकारची मते गृहीत धरता मोठे मताधिक्य अपेक्षित होते. परंतु या प्रभागात वायकर हे किर्तीकर यांच्या पेक्षा १७ मतांनी मागे पडले.त्यामुळे ही अधिकची मते वायकर यांना असती तर निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीच्या प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त करण्याची संधीही विरोधकांना मिळाली नसती. (North West Loksabha Election 2024)

किर्तीकरांना (Amol Kirtikar) खऱ्या अर्थाने हात दिला तो, प्रभाग क्रमांक ७७चे माजी नगरसेवक बाळा नर (Bala Nar) यांच्या मतदार संघाने. या प्रभागात वायकरांचा प्रभाव असूनही किर्तीकर यांना २५०० मते अधिक मिळाली. बाळा नर हे वायकर यांचे कट्टर समर्थक मानले जात असले तरी वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही ते उबाठा शिवसेनेत राहून त्यांनी वायकर यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. (North West Loksabha Election 2024)

(हेही वाचा- Narendra Modi आणि नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार, सोमवारपासून लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू)

 तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका निवडून आलेल्या सोफी नाजिया यांच्या प्रभाग ७८मध्ये ८०००चे मताधिक्य किर्तीकर यांना मिळाले. या मतदार संघात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असून आजवर वायकर यांना मतदान करणाऱ्या मुस्लिम मतदारांनी वायकर उमेदवार असूनही त्यांना मतदान न करता महाविकास आघाडीचे उमेदवार किर्तीकर यांच्या बाजुने मतदान केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. (North West Loksabha Election 2024)

त्यामुळे प्रभाग क्रमांक ७७चे बाळा नगर, प्रभाग क्रमांक ७४च्या उज्वला मोडक, प्रभाग क्रमांक ५३च्या रेखा रामवंशी आणि प्रभाग क्रमांक ७८च्या सोफि नाजिया या चार प्रभागांमध्ये वायकर हे मागे पडले आणि किर्तीकर यांना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातच किर्तीकर यांना सुमारे ११ हजारांचे मताधिक्य मिळाले. संपूर्ण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात वायकर यांना या स्वत:च्या मतदार संघात ७२, ११८ मते पडली आणि अमोल किर्तीकर यांना ८३, ४०९ मत मिळाली. त्यामुळे वायकर हे या मतदार संघात ११,२९१ मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यामुळे वायकर यांना भाजप नगरसेविकेच्या प्रभागातील घटलेले मतदान, मुस्लिमांनी विरोधात केलेले मतदान आणि स्वत:च्या तीन नगरसेवकांच्या प्रभागांमधून अधिकची मते मिळवण्यात आलेले अपयश यामुळेच वायकर यांना काठावर पास होण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. (North West Loksabha Election 2024)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Aus : भारत, ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट)

जागेश्वरी विधानसभा क्षेत्रातील कोणत्या प्रभागांमध्ये कुणाला कितीचे मताधिक्य पहा

प्रभाग क्रमांक ७२ : वायकर यांना ५,६६० चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ७३ : वायकर यांना सुमारे २५००चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ७४ : किर्तीकर यांना १७ चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ७७ : किर्तीकर यांना २५०० चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ७८ : किर्तीकर यांना ८००० चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ७९ : वायकर यांना  १५०० चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक ५३ : वायकर यांना ४०९०चे मताधिक्य

प्रभाग क्रमांक  ५३: किर्तीकर यांना ४०००चे मताधिक्य

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.