‘…तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता’, नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?

139
'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?
'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणातील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या विषयावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. अगदी पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या प्रकरणी जनतेची माफी मागत भव्यदिव्य स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, यावर आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळवळण मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

‘हे’ बांधकाम सुरक्षित
राजकोटवर असलेला छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. हा पुतळा जर स्टेनलेस स्टिलचा बनवला असता तर तो कोसळला नसता. असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केले आहे. समुद्र किनाऱ्याच्या तीन किलोमिटर अंतरात असलेली बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला जावा असा आपला नेहमीच आग्रह असतो, असे गडकरी यावेळी म्हणाले. हे बांधकाम सुरक्षित समजले जाते. शिवाय गंज लागण्याची भितीही नसते. जर मालवण इथं उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टिलचा असता तर तो कोसळला नसता असे गडकरींनी स्पष्ट केले. मुंबईत ज्या वेळी 55 उड्डाणपूल बांधले त्यावेळचा अनुभवही गडकरींनी सांगितला. त्यामुळे समुद्रकिनारी किंवा त्याच्या आजूबाजूला कोणतेही बांधकाम असेल ते स्टेनलेस स्टिलचे असावे असं ते म्हणाले. (Nitin Gadkari)

शरद पवारांची प्रतिक्रीया
नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या या वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गडकरी हे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. ते प्रत्येक काम बारकाईने करत असतात. त्या कामात ते स्वत:ला गुंतवून घेत असतात. त्यांनी आता पुतळ्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्या आधी त्यांनी तज्ज्ञांबरोबर चर्चा केली असेल. त्यानंतरच ते वक्तव्य केलं असेल असे शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.