Nitesh Rane : संजय राऊत येत्या तीन महिन्यात तुरुंगात जाणार – नितेश राणे

संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. २०१९ पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरूंग लावण्याचं काम करत होता.

176
Nitesh Rane : संजय राऊत येत्या तीन महिन्यात तुरुंगात जाणार - नितेश राणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे आता ९० दिवसांमध्ये अध्यक्षांनी योग्य निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होत असतांना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. त्या टीकेला उत्तर देतांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत लवकरच तुरुंगात जाणार असा दावा केला आहे.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांत तक्रार दाखल)

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की,”भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेलेत. जे काही योग्य वायतंय तेच अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्यानेच निर्णय घेतले जातील, तुला काय करायचंय ते कर”, असा ऐकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

९० दिवसांत संजय राऊत तुरुंगात जाणार

“मी बेट लावून सांगतो की पुढच्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पाहा. तीन महिन्यांनंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये आरोप निश्चित झालेला आहे. आता हा ९० दिवसांचा मेहमान आहे. ९० दिवसांनी हा तुरुंगात दिसणार”, असा दावाही नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे.

हेही पहा – 

राऊत याला मुख्यमंत्री बनायचं होतं

“संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. २०१९ पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरूंग लावण्याचं काम करत होता. ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवार साहेबांनी ठाकरेंना बसवलं. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”, असंही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.