Uddhav Thackeray: ‘शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली’; असं कोण म्हणालं?

135
Uddhav Thackeray: 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली'; असं कोण म्हणालं?
Uddhav Thackeray: 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली'; असं कोण म्हणालं?

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मविआत (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन धुसफूस सुरू होती. मात्र, शरद पवारांनी (Sharad Pawar) यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्याबळ ठरवून निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. मात्र, यावर आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

(हेही वाचा-‘…तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता’, नेमकं काय म्हणाले Nitin Gadkari?)

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना ची लायकी दाखवून दिली.”

(हेही वाचा-Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)

“मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेले. सगळे कार्यक्रम केले, फक्त मुजरा करायचा बाकी राहिलेला. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशी भूमिका घेत असेल, तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान बंद झालय.” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.