“आमच्यासाठी उद्धव ठाकरेंचा पायगुण इतका चांगला आहे की…”Nitesh Rane असं का म्हणाले?

183
"आमच्यासाठी उद्धव ठाकरेंचा पायगुण इतका चांगला आहे की..."Nitesh Rane असं का म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) सिंधुदुर्गात तीन सभा झाल्या. यावेळी ठाकरेंनी अदानी, महायुती यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर दिलं आहे. नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “भाजपा आणि शिंदे यांच्या जाहिराती समानामध्ये का चालतात? भाजपा आणि नेत्यांच्या जाहिरातीवर आक्षेप असेल तर छापू नका. महायुतीचा पैसा चालतो, केवळ सकाळी उठून खडी फोडायची, अशा डबलढोलकी पणाला जनता चांगली ओळखते.”

जेव्हा-जेव्हा उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात प्रचारासाठी आले…
ठाकरेंच्या सभांचं निवडणुकीवर काय परिणाम होईल, या प्रश्नावर बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “23 तारखेला आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार. त्यात उद्धव ठाकरेंचा सिंहाचा नाही, खारीचा वाटा असेल. जेव्हा-जेव्हा उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात प्रचारासाठी आले, आधी लोकसभेला आले, जिथे सभा झाली, तिथून मला शिव्या-शाप दिल्या. माझं मतदान 29 वरुन 42 हजारवर गेलं. आमच्यासाठी त्यांचा पायगुणच इतका चांगला आहे की, ते आले आमच्या तिन्ही सीट कन्फर्म झाल्या. आता फक्त गुलाल उडवायचा बाकी आहे. उद्धव ठाकरे उबाठाच्या उमेदवारांसाठी पनवती आहे, पण आमच्यासाठी ते चांगले आहेत.” असं राणे म्हणाले.

… तर गौतम अदानींचं विमान कस चालतं?
“गौतम अदानी जर एवढे खटकत असतील, तर त्यांचं विमान कस चालतं? लपून छपून कोण भेटतं? ह्याची माहिती आम्ही द्यायची का? गौतम अदानींसोबत बसून ढोकळा आणि चटणी खायची आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करायची हा नौटंकीपणा जनतेने ओळखलेला आहे. तुझा मालक (उद्धव ठाकरे) जेव्हा लंडनला जातो, तेव्हा सोबत कुठला उद्योगपती तिकीट काढण्यासाठी असतो? हॉटेल बुकिंग करताना गुजराती माणसावर, गुजराती समाजावर आक्षेप नसतो. ते खर्च उचलतात ते चालतं, एकापण रेस्टॉरंटमध्ये बिल भरत नाही ते चालतं. तुझ्या घाणेरड्या राजकारणासाठी सकाळी उठून आमची सकाळ खराब करण्याच काम असेल, तर त्याचं चोख उत्तर 23 तारखेला मिळेल. भाजपा अन् बाळासाहेबांचे संबंध उद्धव ठाकरेंना समजणार नाही, तेव्हा ते कॅमेरा साफ करत होते.” असं नितेश राणेंनी (Nitesh Rane) म्हटलं आहे.

प्रचार सभेत एक तरी विकासाचा मुद्धा आला का?
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “कालच्या प्रचार सभेत एक तरी विकासाचा मुद्धा आला का? एक तरी विकासाचा मुद्धा कालच्या भाषणात दाखवा, मी त्यांना बक्षीस देतो. दरोडेखोर कोण आहेत ते चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. 23 तारखेनंतर तुम्ही बेरोजगार होणार. पुतळा तयार झाला की फोटोग्राफीची ऑर्डर तुम्हाला देणार. बागायतदारांसाठी असंख्या योजना आहेत ते उद्धव ठाकरेंना दिसत नाही. उद्धव ठाकरेंच्या सभेत हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.