“अजून थांबला असता तर …” राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर Nilesh Rane यांची रात्री पावणे दोनला ट्विटर पोस्ट

228
"अजून थांबला असता तर ..." राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर Nilesh Rane यांची रात्री पावणे दोनला ट्विटर पोस्ट

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. राजकोट किल्ल्यावरच दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापसात भिडले. त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेही पहाणीसाठी आले होते.

राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या राड्यानंतर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उबाठा गटाला सोशल मीडियावरुन पुन्हा डिवचलं आहे. रात्री पावणे दोनच्या सुमारास निलेश राणेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करत ठाकरेंना आव्हान दिलं आहे. ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. असं म्हणत त्यांनी जोरदार घणाघात केला आहे.

अजून थांबला असता तर …
निलेश राणे (Nilesh Rane) ट्विट करत म्हणाले, “ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. एक ठाकरे एक आमदार एक विरोधी पक्ष नेता एक माजी खासदार असून सुद्धा हतबल झाले. अडीच तास लपून बसावं लागलं. उबाठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला, मैदान सोडून एका बाजूने सटकावं लागलं. हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता, आदित्य सारखा घाबरट मी बघितला नाही.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.