Sanjay Raut यांच्या पोस्टवर त्यांचीच प्रकरणे चव्हाट्यावर

209
Sanjay Raut यांच्या पोस्टवर त्यांचीच प्रकरणे चव्हाट्यावर
  • खास प्रतिनिधी

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी X वर एन्काउंटर प्रकरणावर उपस्थित केलेल्या एका पोस्टवर लोकांनी त्यांच्यावरच राग काढला तसेच त्यांच्याशी आणि त्यांचे नेते आदित्य ठाकरे संबंधित प्रकरणे चव्हाट्यावर आणली.

राऊत यांनी नालासोपारा येथील ‘भाजपा पदाधिकाऱ्याकडून सामूहिक बलात्कार’ अशा आशयाची बातमी दाखवत “गृहमंत्री फडणवीस हे खरे आहे ? आता करा यांचेही एनकाउंटर! आणि लावा आपण singham असल्याचे पोस्टर!”, अशी पोस्ट केली. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला मात्र राऊत आणि आदित्य ठाकरे यांचीच जुनी प्रकरणे चव्हाट्यावर आणत जाब विचारला.


(हेही वाचा – Government College of Pharmacy Amravati : शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावतीची फी संरचना काय आहे?)

एका नेटकाऱ्याने, “फडणवीस साहेब, फोनवर स्त्रीला दम देऊन घाण घाण शिव्या देणाऱ्या ह्या संज्याचाच पहिले एन्काऊंटर करा, अशी समस्त महाराष्ट्राची मागणी आहे ….” त्यावर एकाने प्रश्न केला की, “स्वप्ना पाटकर केसमधल्या आरोपीचा का करू नये?”

एका महिलेने, “येड्याची जत्रा , गुन्हे सिद्ध झालेत का? बर मग ती सुशांत राजपूत आणि दिशा सालियन टॉर्चर अँड मर्डर केस ओपन करायची का?” असा सवाल केला.

(हेही वाचा – Bombay High Court चा सुधारित आयटी नियमांविषयी मोठा निर्णय)

एकाने तर “दिशा सालियन आणि सुशांतच्या मारेकर्‍याचा पण एन्काऊंटर झाला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. तर एकाने “ही बातमी १००% खरी असेल तर मी पण एन्काऊंटर करा, ह्या गोष्टीस समर्थन देईन. दिशा आणि सुशांतच्या केसकडे देखील बघा, कोण वाचवत आहेत ह्यांच्या मारेकऱ्यांना,” असा मुद्दा मांडला.

एका महिलेने “स्त्रिला शिवीगाळ करणारया ह्या भडव्यापासून सुरवात करायची का एन्काउंटर करायची. @OfficeofUT चालेल का तुम्हाला,” असे उत्तर देत राऊत आणि स्वप्ना पाटकर यांचा फोनवरील संवाद असलेली ऑडिओ क्लिप पोस्ट केली. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.