मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदान सक्ती कायदा करण्याची गरज; केंद्रीय राज्यमंत्री Ramdas Athawale यांची भूमिका

132
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राज्यात ६६ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. वास्तविक ४४ टक्के मतदार मतदानाचा हक्क बजावत नाही, ही शोकांतिका आहे. मतदानाचा टक्का किमान कधीतरी ७५ टक्के तरी पार पाडणार आहे का, असा प्रश्न आहे. मतदानाची कमी टक्केवारी समोर आल्याने यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आता मतदान सक्तीचे करावे, अशी भूमिका मांडली आहे.
रामदास आठवले  (Ramdas Athawale) यांनी वांद्रे पूर्वकडील गांधीनगर येथे सहकुटुंब मतदान केले, त्यानंतर त्यांनी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, मतदारांनी सुट्टी घ्यावी अन् मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. लोकशाही सृद्ढ होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मात्र, मतदान 50 टक्के किंवा त्या दरम्यान होत असल्याने मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही आठवले  (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.
मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी बुथची संख्या वाढवावी आणि हजार मतदारांऐवजी एका बुथवर 500 मतदारांची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. ‘मतदान करा व मग जा आपल्या घरा’ असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. सरकारने केलेल्या कामामुळे महायुतीला 165 जागांवर विजय मिळेल आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.मतदारांना सुट्टी, फुकट अनुदान, फुकटचे पैसे किंवा अशा योजना देण्याऐवजी एखादा कडक कायदा बनवून मतदान करणे बंधनकारक करावे आणि त्या आधारावरच सरकारी योजनांचा लाभ, सर्व प्रकारच्या कर्जांची आकारणी किंवा सूट, सरकारी प्रमाणपत्रांचे किंवा लायसन्सचे नूतनीकरण, सर्व प्रकारच्या नोंदणी शुल्कात सूट वगैरे ठरवावे. उलटपक्षी जे लोक मतदान करणार नाहीत, त्यांच्यावर विशेष दंड आकारावा. मतदारांना मतदान केल्याचे प्रमाणपत्र किंवा काहीतरी ॲानलाईन पावती मिळवून द्यावी. एखादा असा कायदा कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल, याचा विचार करून त्याप्रकारची व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. जनजागृती करून अनेक वर्ष झाली अनेक निवडणुका झाल्या पण लोक सुधारले नाहीत त्यासाठी फक्त कायद्याचा बडगा आणि धाक हवाच, खास करून त्याशिवाय स्वतःला शहरी सुशिक्षित समजणारे लोकं सुधारणार नाहीत.
– पुरुषोत्तम कांबळे, दादर, मुंबई

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.