झारखंड मध्ये NDA चे शिक्कामोर्तब; भाजपा ६८, तर इतरांना दहा जागा

106
झारखंड मध्ये NDA चे शिक्कामोर्तब; भाजपा ६८, तर इतरांना दहा जागा
  • प्रतिनिधी 

झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) चे जागावाटप झाले आहे. या जागावाटपाच्या अंतर्गत भाजपा झारखंडमधील ६८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. एजीएसयुला १० जागा, जेडीयुला दोन आणि एलजेपी (आर) ला एक जागा देण्यात आली आहे.

झारखंड भाजपाचे सहप्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. झारखंड भाजपाचे प्रभारी आणि केंद्रीयमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भाजपा-जेडीयु-एजीएसयु आणि एलजेपी (आर) झारखंड विधानसभा निवडणूक एकत्र लढतील. पक्षांमध्ये जागावाटप करण्यात आले असून उमेदवारही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. (NDA)

(हेही वाचा – Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळांना मुबलक निधी)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झारखंड विधानसभेच्या ज्या १० जागांवर एजीएसयु निवडणूक लढवणार आहे त्यात सिल्ली, रामगढ, गोमिया, इचागड, मांडू, जुगसालिया, डुमरी, पाकूर, लोहरदगा, मनोहरपूर यांचा समावेश आहे. जेडीयू जमशेदपूर पश्चिम आणि तामर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. चतरा विधानसभेची जागा चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी रामविलास यांना देण्यात आली आहे. (NDA)

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये, एनडीएचा सामना जेएमएम-नेतृत्वाखालील इंडी आघाडीशी होईल, ज्यामध्ये जेएमएम, काँग्रेस, आरजेडी यांचा समावेश आहे. ही आघाडी किती जागा मिळवते, ते महत्त्वाचे ठरेल. (NDA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.