- खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत आमदारांच्या बोलण्यावर चाप लावण्याची मागणी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांकडे केली. (Assembly Session)
अध्यक्षांचे अभिनंदन
सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड केली. त्यानंतर नार्वेकर यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्याला पाठिंबा देताना जयंत पाटील बोलत होते. (Assembly Session)
(हेही वाचा – Secular शब्दावरून नेटकऱ्यांकडून मुंब्राच्या आव्हाडांना दिले बौद्धिक!)
बसून बोलणाऱ्यांमुळे व्यत्यय
जयंत पाटील यांनी वेगळ्या विषयांवर आपले मत मांडले. त्यात त्यांनी एखादा आमदार एखाद्या विषयावर सभागृहात मत मांडत असताना अन्य काही जागेवर बसलेले आमदार मध्ये बोलून त्या आमदाराच्या बोलण्यात व्यत्यय निर्माण करतात, याकडे लक्ष वेधले. तसेच सभागृहात आमदार बोलत असताना बसून बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे, अशी मागणी केली. (Assembly Session)
वेळेचे इंडिकेटर लावावे
अनेकदा बोलताना आमदारांकडून वेळेचे भान राखले जात नाही. आमदारांनी थोडक्यात विषय मांडावा यासाठी त्यांना वेळेची मर्यादा घालावी, असे सांगताना पाटील पुढे म्हणाले, “परदेशात सभागृहात सदस्यांसाठी वेळेचे इंडिकेटर लावलेले असते. पाच मिनिटे की पंधरा मिनिटे आपल्याकडे आहेत, हे त्याला कळते. तसे इंडिकेटर विधानसभा सभागृहात लावण्याबाबत गटनेत्यांची बैठक आयोजित करावी. कोणती चर्चा किती काळ करावी, यालाही काही मर्यादा असावी, अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. (Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community