Home सत्ताबाजार …तर १६ आमदार अपात्र ठरले असते; अजित पवारांनी सांगितली मविआची ‘ती’ घोडचूक

…तर १६ आमदार अपात्र ठरले असते; अजित पवारांनी सांगितली मविआची ‘ती’ घोडचूक

38
...तर १६ आमदार अपात्र ठरले असते; अजित पवारांनी सांगितली मविआची 'ती' घोडचूक
...तर १६ आमदार अपात्र ठरले असते; अजित पवारांनी सांगितली मविआची 'ती' घोडचूक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तेव्हा पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया उमटत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, टीका, टोला लगावत आहेत. पण अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करत महाविकास आघाडीची घोडचूक सांगितली.

ठाकरेंना अंधारात ठेऊन पटोलेंनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळेस आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी (नाना पटोले) राजीनामा दिला, तो राजीनामा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) न विचारता दिला. राजीनामा दिल्यावरच सांगण्यात आले राजीनामा दिला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकतर तो नको होता द्यायला, तो दिला गेला. दुसर म्हणजे तो राजीनामा मंजूर झाल्या झाल्या लगेचच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता. तो पण दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून, मी कोणाला एकट्याला दोषी धरतोय, हे अजिबात नाही, आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता, तर तिथे विधानसभेचे अध्यक्ष बसले असते आणि त्याच्या अधिपत्याखाली गोष्टी झाल्या असत्या.

(हेही वाचा – जर शरद पवारांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावं लागेल; फडणवीसांचा टोला)

…तर १६ लोकांना अपात्र केले असते

पुढे अजित पवार म्हणाले की, अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्ष कामकाज बघत होते. त्याच्यावर ते नेमके पद रिक्त राहिले होते. आणि या घटना घडल्या आणि ताबडतोब त्यांनी ते पद भरण्याचा प्रयत्न केला, बहुमत त्यांच्याकडे होते आणि ते पद भरले गेले. जर ते पद भरलेलेच असते तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी या १६ लोकांना अपात्र केले असते. जसे पाठिमागच्या काळात अरुणभाई गुजराथी अध्यक्ष असताना ६ आमदारांनी त्यावेळेस अशाच पद्धतीने बंड केला होता. आणि वेगळी राजकीय भूमिका घेऊन पुढे जायचे ठरवले होते. त्यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने अरुणभाईंनी त्या ६ लोकांना अपात्र केले आणि सरकार तरलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.