Raj Thackeray : राज ठाकरेंचा तीन दिवसांचा नाशिक दौरा

गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरे नाशिक मुक्कामी येणार असून या दौऱ्यात राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

172

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापले असून प्रत्येक पक्ष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोटबांधणी करताना दिसून येत आहे. त्यानुसार एकीकडे मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेने पुन्हा एकदा नवनिर्माण करण्याचे ठरवल्याचे मागील काही बैठकांवरुन दिसून येत आहे. याच नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोश भरण्यासाठी खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम नेतेमंडळी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. 19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत. राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 2017 सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिकमधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष घातल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा Trimbakeshwar Temple : औरंगजेबाने त्र्यंबकेश्वर मंदिर पाडून बांधलेली मशीद; मराठ्यांनी केला जीर्णोद्धार; नाशिकच्या ज्योतिर्लिंगाचा काय आहे इतिहास?)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरेंचे नाशकात आगमन होणार आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरे नाशिक मुक्कामी येणार असून या दौऱ्यात राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. याच सोबत शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर उद्या राज ठाकरेंची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का याकडे ही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.