Nashik Congress च्या होर्डिंगवरुन एकमेव आमदाराचा फोटो गायब, कारण काय?

120
Nashik Congress च्या होर्डिंगवरुन एकमेव आमदाराचा फोटो गायब, कारण काय?
Nashik Congress च्या होर्डिंगवरुन एकमेव आमदाराचा फोटो गायब, कारण काय?

नाशिक (Nashik Congress) आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या आजच्या मेळाव्यानंतर घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसची कोणत्या मतदारसंघात किती ताकद आहे? याची माहिती पक्षातील नेते घेणार आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लागलेला होर्डिंग वर जिल्ह्यातील एकमेव आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचे फोटो नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग
हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते काँग्रेसच्या पदाधिकारी मिळाव्याला तसेच बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. वास्तविक विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा संशय आमदार खोसकर यांच्यावर व्यक्त करण्यात आला आहे. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्या आधीच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. (Nashik Congress)

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंची भेट
काही दिवसांपूर्वीच आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे खोसकर आता काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मी काँग्रेस सोबतच असल्याच दावा खोसकर यांनी केला होता. केवळ मतदार संघातील विकास कामांच्या निधीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे खोसकर यांनी स्पष्ट केले होते. (Nashik Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.