Naresh Mhaske यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले…

213
Naresh Mhaske यांची संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका; म्हणाले...
  • प्रतिनिधी

सोमवारी राज्य सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरुन शिवसेना उबाठा नेते व पक्ष प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीकेचा निशाणा साधल्याने लगेच शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनीही थेट राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकेचा भडिमार केला.

बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात मंगळवारी (१ ऑक्टबर) पत्रकारांशी बोलताना खा. म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले, तुम्ही आता गोमातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे आहेत. त्यातही कसं आहे ना, डुक्कराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसंच तुमचं आहे. त्यांतही तुम्हाला चांगली भाषा कळतच नसल्याने याच भाषेत तुम्हाला बोललं पाहिजे, अशा परखड शब्दात त्यांनी खा. राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

(हेही वाचा – Congress : पवार आणि ठाकरेंकडे फक्त सहानुभूतीच; उमेदवारीसाठी मात्र इच्छुकांचा ओढा काँग्रेसकडेच)

सनातन हिंदु धर्मात गायीचे अनन्यसाधारण महत्त्व असताना घाणीत लोळणाऱ्या तुमच्या सारख्यांना हे कळणार नाही. ​कारण मतांसाठी तुम्ही लाचार झालेले आहात. त्यामुळे राऊत​ आता केवळ​ तुमची “सुंता” करायची बाकी राहिलीय, आणि ​खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात, यात काहीही शंका नाही. केवळ मतांसाठी मुल्ला मौलवींकडे किती लाचारी पत्करणार, अशी परखड विचारणाही खा. म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊत यांना केली.

तुमचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गोमातेला कसाईच्या हाती देताना मूग गिळून गप्प होते. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरूच असून देशात महाराष्ट्र नंबर एकला आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या प्रकारे झपाटून काम करत आहेत, त्यामुळेच तुमचा जळफळाट झाला आहे, असा प्रखर हल्लाबोलही खा. म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊत यांच्यावर केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.