Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान-भारत दौऱ्यात जी 20 आणि जी 7 वर झाली चर्चा

पंतप्रधानांनी (Narendra Modi) ग्लोबल साऊथच्या समोरील मुद्दे आणि प्राधान्यक्रम अधोरेखित करण्याच्या गरजेवर भर दिला.

28
Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांच्या जपान-भारत दौऱ्यात जी 20 आणि जी 7 वर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांच्यासमवेत 20 मे 2023 रोजी द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान फुमिओ किशिदा यावर्षी मार्च महिन्यात भारतात येऊन गेल्यामुळे दोन्ही नेत्यांची 2023 मधील ही दुसरी बैठक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मार्च 2023 मध्ये भेट दिलेले बोधीचे रोपटे हिरोशिमा येथे लावल्याबद्दल पंतप्रधानांनी जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांचे आभार मानले.

(हेही वाचा – Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी केली ‘वेगळ्या खान्देश’ची मागणी)

भारताच्या संसदेत दरवर्षी हिरोशिमा दिनाचे स्मरण केले जाते आणि जपानचे राजदूत याप्रसंगी नेहमीच उपस्थित असतात, याची आठवण पंतप्रधानांनी (Narendra Modi) करून दिली.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांच्या जी 20 आणि जी 7 अध्यक्षतांखाली होणाऱ्या प्रयत्नांचा योग्य समन्वय साधण्याविषयी चर्चा केली. पंतप्रधानांनी (Narendra Modi) ग्लोबल साऊथच्या समोरील मुद्दे आणि प्राधान्यक्रम अधोरेखित करण्याच्या गरजेवर भर दिला.

दोन्ही नेत्यांनी समकालीन प्रादेशिक घडामोडींवर देखील विचारविनिमय केला. हिंद- प्रशांत क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी देखील त्यांच्यात चर्चा झाली.

हेही पहा – 

द्विपक्षीय विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांची (Narendra Modi) सहमती झाली. शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन, पर्यावरणपूरक जीवनशैली ( लाईफ ), हरित हायड्रोजन, उच्च तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर्स आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, इत्यादी क्षेत्रांवर बैठकीत चर्चा झाली. दहशतवादाचा मुकाबला आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.