Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, PM Narendra Modi यांना चॅलेंज देण्याची तुमची… 

146
Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, PM Narendra Modi यांना चॅलेंज देण्याची तुमची... 
Narayan Rane यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, PM Narendra Modi यांना चॅलेंज देण्याची तुमची... 

भाजपाचे खासदार नारायण राणे  (Narayan Rane) यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (UBT Uddhav Thackeray) जहरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) चॅलेंज देण्याची तुमची औकात आणि लायकी नाही. वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन, भाजपा सरळ केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, भाजप आणि संघ त्यांच्यासोबत आहे. असे विधान नारायण राणे यांनी केले.  (Narayan Rane )

जनाची नाही तर मनाची ठेवा-राणे

उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपाने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य बोलतांना जनाची नाही, तर मनाची तरी ठेवावी, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. (Narayan Rane )

(हेही वाचा – Raksha Bandhan quotes in Marathi : रक्षाबंधन निमित्ताने मराठीतील 10 शुभेच्छा वाक्य)

भविष्यात कोण सत्तेवर राहील हे जनताच ठरवेल-राणे

काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपा आणि आर.एस.एस. (BJP And RSS) त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Narayan Rane )

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.