शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद; Narayan Rane यांची टीका

89
शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद; Narayan Rane यांची टीका
  • प्रतिनिधी

मराठा आरक्षण असो की पुतळा प्रकरण शरद पवार यांची प्रत्येक कृती संशयास्पद असते. मराठ्यांच्या आरक्षणाबाबतही ते राजकारण करत आहेत. वय वर्षे ८३ पर्यंत ते स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकले नाहीत. या वयातही महाराष्ट्र शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. आजही लावालावी करत आहेत आणि जातीजातीत भेद निर्माण करत आहेत, अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी (२ सप्टेंबर) केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी मुंबईत राज्य सरकारच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनावरून शरद पवार यांना लक्ष्य केले.

(हेही वाचा – उबाठा आणि जीव्हीकेवर Kiran Pavaskar यांनी केला खळबळजनक आरोप; म्हणाले…)

चारवेळा मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री असताना त्यांनी आरक्षणाची टक्केवारी का वाढवली नाही? असा सवाल राणे (Narayan Rane) करत यांनी छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनी असायला हवे. शरद पवारांनी बोलायला हवे की, वाद नको. मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देता. आपण नव्याने पुतळा उभारावा. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचे आणि काडी घेऊन फिरायचे, याला महाराष्ट्रात स्थान नाही, असे त्यांनी बजावले.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण कशाला करता? शांततेत मोर्चा का काढत नाहीत? त्यापेक्षा देखणा पुतळा आपण तयार करूयात, असे शरद पवार-उद्धव ठाकरे बोलले असते तर त्यांची कीर्ती वाढली असती, असेही नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. मला फोन करून शिवीगाळ करणारा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाला आहे. त्यामुळे वातावरण बिघडवणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी राणे (Narayan Rane) यांनी यावेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे दुर्दैवी आहे. मात्र, या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेटआउट करा म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? असा सवालही राणे यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.