Nagpur Goa Shaktipeeth expressway: महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक!

79
Nagpur Goa Shaktipeeth expressway: महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक!
Nagpur Goa Shaktipeeth expressway: महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक!

नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाबाबत (Nagpur Goa Shaktipeeth expressway) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक मिळाला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन सरकारने थांबवलं होत. आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

(हेही वाचा-Pune News: गणेशोत्सवात पुण्यातील ‘या’ रस्त्यांवर जड वाहनांना बंदी)

राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र शेतक-यांच्या विरोधानंतर राज्य सरकरने मोठा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हा 802 किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे. राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं होते. (Nagpur Goa Shaktipeeth expressway)

राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग पर्यंत नियोजित होता. शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार 86 हजार कोटी रुपये खर्च करणार होतं. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा विचार होता. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार होता. (Nagpur Goa Shaktipeeth expressway)

‘या’ तीर्थक्षेत्रांना जोडणारा होता शक्तीपीठ महामार्ग
शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्द जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता. (Nagpur Goa Shaktipeeth expressway)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.