Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा झेंडा

131
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा झेंडा
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा झेंडा

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदार संघाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे) युवासेनेने भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारत युवासेनेने दहा पैकी रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या ९ जागांवर दणदणीत विजय मिळवून विद्यापीठावर भगवा झेंडा फडकवला. आदित्य ठाकरेंनी त्यानंतर भाजपवर सडकून टीका केली. (Mumbai University Senate Election)

(हेही वाचा- Mukhyamantri Yojana Doot साठी अर्ज करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

शिवसेना फुटीनंतर राज्यात झालेल्या सत्तातरानंतर मुंबई विद्यापीठाची निवडणुकीत प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपाने या निवडणुकीवर सातत्याने आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे सलग दोन वेळा वेगवेगळी कारणे देऊन निवडणुका स्थगित करण्यात आल्या. अखेर २२ सप्टेंबरला ही निवडणूक विद्यापीठाने निवडणूक जाहीर केली. मात्र आयआयटी कारण देत, मुंबई विद्यापीठाने ही निवडणूक पु्न्हा पुढे ढकलली. या प्रकरणी शिवसेनेने (ठाकरे) न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने विद्यापीठाला चांगलेच फैलावर घेत, येत्या २५ सप्टेंबर निवडणूक आणि २७ सप्टेंबर मोजणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महत्वाची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी (ता.२७) सुरूवात झाली. विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली. एकूण २८ उमेदवारांनी अर्ज केला होता. परंतु, युवासेना (ठाकरे) विरुद्ध भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट निवडणूक झाली. या निवडणुकीत युवासेनेने दहा जागांपैकी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात ९ जागा जिंकून अभाविपचा दारूण पराभव केला.(Mumbai University Senate Election)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.