अमृता फडणवीसांकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी; आरोपी अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

134

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. तसेच या सुनावणी दरम्यान अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल १० कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक खुलासा सरकारी वकिलांनी केला.

या सुनावणीत सरकारी वकिलांनी दावा केला की, ऑडिओ क्लिप्स आणि इतर डाटा नष्ट करण्यासाठी आरोपीने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटींची खंडणीही मागितली. जर १० कोटींची खंडणी दिली नाही तर या सगळ्या ऑडिओ क्लिप्स आणि मेसेज मी सार्वजनिक करेन अशी धमकीही अनिक्षाने अमृता फडणवीस यांना दिली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनिक्षाची कसून चौकशी करणे गरजेचे असल्याने पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात येत्या काळात काय-काय खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा – अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेदींना सुनावले, म्हणाल्या ‘मॅडम चतुर…’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.